प्रस्तावना:-
🙏विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषय म्हंटला की आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो; तो म्हणजे या विषयाचा व्याकरण कोणता आणि तो कसा अभ्यासावा. बाजारात विविध लेखकांची विविध व्याकरणाची पुस्तके उपलब्ध आहेत, ती ही चांगलीच आहेत. पण आजकालच्या मोबाईलच्या युगात अभ्यास ही मुले तसाच करतात, कारण कोणत्याही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना तेथे यश मिळविण्यासाठी व्याकरण तुम्ही कोणता अभ्यासता याला महत्व निर्माण होतो. या दृष्टीने मी काही मराठीतील व्याकरण उदाहरणासहित तुंम्हाला देत आहे. त्याचा तुंम्हाला नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही.🤘🤘🤘
प्रकरण - 1
अव्ययांचे प्रकार
शब्द -
शब्द हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गिकरण केलेले आपल्याला दिसते. या शब्दजातींचे मित्रांनो दोन प्रकार पडतात. ते खालील प्रमाणे..
1) विकारी शब्द -
ज्या शब्दांच्या मूळ रुपात बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द (बदल होणारे) असे म्हणतात.
उदा. देव - देवाला
2) अविकारी शब्द -
ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द (बदल न होणारे ) म्हणतात.
उदा. तिथे

1) विकारी शब्दजाती:-
* नाम
* सर्वनाम
* विशेषण
* क्रियापद
2) अविकारी शब्दजाती:-
* क्रियाविशेषण अव्यय
* शब्दयोगी अव्यय
* उभयान्वयी अव्यय
* केवलप्रयोगी अव्यय
उपरोक्त जातींची माहिती मित्रांनो आपल्याला साध्या, सरळ भाषेत खालील प्रमाणे अभ्यासता येईल.
1) विकारी शब्दजाती :-
व्यक्ती, वस्तू, गुणधर्म, कल्पनांना व्याकरणात जी नावे दिली जातात त्यांना नाम म्हणतात.
उदा :- वही, रमण, साहस, सुंदर, मुलगी इ.
मित्रांनो, नामाचे तीन प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे..
👉 # सामान्य नाम
# विशेष नाम
# भाववाचक नाम
विश्लेषण ☝ खालीलप्रमाणे आहे.
# सामान्य नाम :- समान गुणधर्मामुळे येथे वस्तूला जनरल नाव दिले जाते, तेव्हा सामान्य नाम होते.
उदा:- शाळा, मुलगी, तलाव इ.
👉 सामान्य नामाचे दोन उपप्रकार पडतात. ते खालीलप्रमाण..
अ) पदार्थवाचक नाम :- उदा:- दही, पितळ, तेल इ.
आ) समुदायवाचक नाम :- उदा:- समूह, घोळका, वर्ग, गट, इ.
# विशेष नाम :- ज्या नामातून विशिष्टता दिसते, तेव्हा विशेष नाम होतो.
उदा:- कृष्णा, तेलंगणा, दरी इ.
# भाववाचक नाम:- गुण, धर्म, भाव यांचा बोध होणे म्हणजे भाववाचक नाम होय.
उदा:- सौंदर्य, रसिकता, मधुरता, जिज्ञासा, आपुलकी इ.
* सर्वनाम :-
वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय.
# सर्वनामाचे प्रकार :-
1) पुरूषवाचक सर्वनाम
2) दर्शक सर्वनाम
3) संबंधी सर्वनाम
4) प्रश्नार्थक सर्वनाम
5) अनिश्चित सर्वनाम
6) आत्मवाचक सर्वनाम
👉 पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात.
अ) प्रथमपुरूषवाचक सर्वनाम :- उदा :- स्वतः, आपण, आम्ही, मी
आ) द्वितीयपुरूषवाचक सर्वनाम :- उदा :- स्वतः, आपण, तुम्ही, तु
इ) तृतीयपुरूषवाचक सर्वनाम :- उदा :- त्यांनी, त्या, ते, ती, तो
2) दर्शक सर्वनाम :- दर्शक म्हणजे दाखविणे.
उदा:- हे, हा, ही, ते, तो, ते
3) संबंधी सर्वनाम :- म्हणजे सहसंबंध दर्शविणे.
उदा:- जे जे, ते ते, जो-तो, जेथे-तेथे
4) प्रश्नार्थक सर्वनाम :- उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो.
उदा:- काय, कोणाला, कोणास, कोण, कोणी
5) अनिश्चित सर्वनाम :- निश्चितता नसते.
उदा:- 1) कोणी कोणास बोलू नये.
2) त्या तिथे काय आहे.
6) आत्मवाचक सर्वनाम:- उदा :- स्वतः
* विशेषण :-
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.
👉विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
1) गुणविशेषण
2) संख्याविशेषण
3) सार्वनामिक विशेषण
1) गुणविशेषण :- विशेष गुण दाखविला जातो.
उदा:- शुभ्र कापड , पराक्रमी सरदार, लहान मुल, मधुर आंबा
2) संख्याविशेषण :- संख्या दाखविली जाते.
👉संख्याविशेषणाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत..
अ) क्रमवाचक संख्याविशेषण:- उदा :- तिसरी गल्ली, चौथा वर्ग, दुसरा नाका
आ) अनिश्चित संख्याविशेषण:- उदा:- काही गाव, सर्व जण, इतर सर्व
इ) आवृत्तीवाचक संख्याविशेषण :- उदा :- दुसरी आवृत्ती, दहापट रक्कम, डझनभर केळी
ई) पृथकत्ववाचक संख्याविशेषण :- वेगळेपणा दाखविण्यात येतो.
उदा:- एकेक गट, चार चारचा ग्रुप
उ) गणनावाचक संख्याविशेषण :- मोजता येतात .
उदा:- दोन भाऊ, पंचरत्ने, त्रिमूर्ति
👉 गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन प्रकार पडतात.
क) पूर्णांकवाचक :- उदा:- शंभर नारळ, पाच रुपये
ख) अपूर्णांकवाचक :- उदा:- पावणे तीन किलो चहा पत्ती, अर्धा मीटर कागद
साकल्यवाचक:- सर्व वस्तू दाखविणे.
उदा:- तुम्ही सगळे, तुम्ही दोनही
*क्रियापद :-
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
👉 क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पडतात.
1) सकर्मक क्रियापद
2) अकर्मक क्रियापद
1) सकर्मक क्रियापद:- येथे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्म आवश्यक असतो.
उदा:- सुमन हार करते.
2) अकर्मक क्रियापद:- येथे क्रिया कर्ता किंवा त्याच्यावरच घडते, पुढे जात नाही.
उदा:- मी वाटेत पडलो.

No comments:
Post a Comment