Indian constitution - Article

Hi... !!! friends....🙏
                        Every one should know the Indian Constitution... that's good, but when those student doing the preparation about any Exam & preparation our indian constitution they face; how to study it perfectly! so Friend's, here I will try to give you some of the main Article for getting more & more sucesss in exam. All the information are useful anytime so study carefully.🤘🤘🤘

                                   
   

* मूलभूत हक्क - कलम 14 ते 35

1. समतेचा हक्क - कलम 14 ते 18

2. स्वातंत्र्याचा हक्क - 19

3. गुन्ह्याबददल दोषी ठरविण्यासंबंधातील संरक्षण - कलम 20

4. जीविताचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण - कलम 21

5. अटकेपासून व तुरूंगात डांबून ठेवण्यापासून संरक्षण - कलम 22

6. शोषणाविरूद्धचा हक्क - कलम 23 व 24

7. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क - कलम 25 ते 28

8. शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क - कलम 29 व 30

9. संपत्तीचा हक्क - कलम 31 व 32 (ब) व परिशिष्ट 9 - रद्द

10. घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क - कलम 32 ते 35 व 359


* मूलभूत कर्तव्य - कलम 51 अ

* मार्गदर्शक तत्वे - कलम 37 ते 51 व 355

* राष्ट्रपतिविषयक तरतुदी - कलम 52 ते 62 व 73

1. शासनाची सर्व कामे राष्ट्रपतीच्या नावाने केली जातात - कलम 77 (1)

2. राष्ट्रपती पंतप्रधानांची व त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक करतात - कलम 74

3. राष्ट्रपतिपद ग्रहण करतेवेळी घ्यावयाच्या शपथेचा मसुदा - कलम 60

4. देशाच्या तीनही सेनादलांचे सर्वोच्च प्रमुख - कलम 53 (2)

5. अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार - कलम 123

6. गुन्हेगाराची शिक्षा तहकूब करणे, पुढे ढकलणे, कमी करणे अथवा रद्द करणे - कलम 72 (ब)

7. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका करण्याचा अधिकार - कलम 124

8. बाह्य आक्रमणे, अंतर्गत बंडाळी अथवा देशातील एखाद्या विभागाच्या सुरक्षेला धोका - राष्ट्रीय आणीबाणी - कलम 352

9. एखाद्या किंवा काही राज्यांत घटनाव्यवस्था कोलमडून पडते व राज्यशासन घटनेनुसार चालविले जाऊ शकत नाही तेव्हा राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार - घटनात्मक आणीबाणी - कलम 356

10. भारताच्या अथवा भारतातील एखाद्या विभागाच्या आर्थिक स्थैर्यास धोका निर्माण झाला आहे अथवा अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे - आर्थिक आणीबाणी - कलम 360

11. महाअभियोगाची प्रक्रिया - कलम 61

* उपराष्ट्रपती संदर्भात तरतूदी - कलम 63 ते 71

1. उपराष्ट्रपतिपद स्वीकारताना घ्यावयाच्या शपथेचा मसुदा - कलम 69

* पंतप्रधान विषय तरतूदी - कलम 75 व 78

1. मंत्रिमंडळ विषयक तरतूदी - कलम 74 व 75

2. राष्ट्रपतींस मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाची रचना - कलम 74 (1)

* राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा संसदेमध्ये समावेश - कलम 79

* घटना दुरूस्ती करावयाची असल्यास - कलम 368

* सर्वोच्च न्यायालयाची तरतूद - कलम 124

* भारतातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल - कलम 214 हे कलम 231 सह वाचने अगत्याचे आहे.

1. संसद कायदा करून दोन किंवा अधिक घटक राज्ये किंवा त्यांबरोबर संघराज्य प्रदेश यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापण करू शकेल - कलम 231

* घटक राज्याच्या कायदेमंडळात त्या राज्याचे राज्यपाल, विधानसभा व विधानपरिषद यांचा समावेश होतो - कलम 168

* विधानपरिषद निर्माण करण्याचे अथवा बरखास्त करण्याचे अधिकार - कलम 169

* भारताचा महान्यायवादी कॅबिनेट सदस्य नसला तरी त्यास संसदेच्या दोन्ही गृहांतील कामकाजात भाग घेता येतो - कलम 88

1. मतदानाचा अधिकार वगळता त्यास संसद सदस्याचे सर्व विशेषाधिका प्राप्त होतात - कलम 105 (4) तो शासनाचा पूर्णवेळचा सल्लागार अथवा शासकीय नोकरही नसतो.

* भारताच्या सरहिशेबतपासनिसाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहेत - कलम 148

* कम्प्ट्रोलर जनरल ऑफ अकाऊंट्स च्या कार्यालयाच्या कामकाजाची महत्वाची बाब- भारताच्या एकत्रित व संचित निधीतील, तसेच अकस्मात खर्च निधीतील जमा - खर्चावर नियंत्रण ठेवणे - कलम 283

* अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा - कलम 17

* राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडीसंदर्भात काही विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहेत - कलम 71

* केंद्र शासनाच्या कारभाराविषयीची माहिती व केंद्रिय मंत्रीमंडळाने घेतलेले निर्णय पंतप्रधान राष्ट्रपतींना कळवितात. राष्ट्रपतिंसंदर्भातील पंतप्रधानांची ही कर्तव्ये - कलम 78

* राष्ट्रपती अर्थ/वित्त आयोगाची रचना करतो - कलम 280 (1)

* अर्थविषयक विधेयकाची व्याख्या - कलम 110

* सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे स्पष्ट - कलम 129

* प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे स्पष्ट - कलम 215

* राष्ट्रपती खालील कलमान्वये आणीबाणी पुकारतात तेव्हा घटनेतील कलम 19 व त्यात अंतर्भूत असलेली सहा स्वातंत्र्य आपोआपच रद्द् ठरतात - कलम 352

* गुन्हेगारास शिक्षेत माफी देण्याचे राज्यपालांचे अधिकार - कलम 161

* भारतीय घटनेतील सर्वाधिक दुरूस्त्या संबंधित - कलम 13

* संसदेत - राष्ट्रपती, लोकसभा, व राज्यसभा या घटकांचा समावेश - कलम 79

* मूलभूत हक्कांवर गदा आणणारा कोणताही कायदा हा व्यर्थ ठरतो - कलम 13

* भारतात निवडणूक आयोगाची रचना - कलम 324

* भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात - कलम 18

* सर्वोच्च न्यायालयाचा आपल्या स्व:च्याच निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार - कलम 137

* भारतीय संघराज्यात नवीन राज्य सामील करून घेण्याचा, नवीन राज्य प्रस्थापित करण्याचा अथवा राज्य पुनर्रचनेचा अधिकार संसदेस आहे - कलम 2

* एखाद्या महत्वाच्या कायदेशीर बाबीवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात - कलम 143

* केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद - कलम 315 (1)

* संसद आणीबाणीच्या काळात राज्य सूचीतील विषयांसंबंधी कायदे करू शकते - कलम 250

* संसदेस एखाद्या राज्याचा प्रदेश कमी-अधिक करण्याचा, राज्यांच्या सीमारेषा बदलण्याचा तसेच राज्याचे नावही बदलण्याचा अधिकार आहे - कलम 3

* भारताच्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 545 सभासद असतात - कलम 81

* राष्ट्रपतींना लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार आहे - कलम 108

* भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे स्पष्ट होते - कलम 25 ते 28

* राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात - कलम 85
* दोन्ही गृहांनी संमत केलेले विधेयक राष्ट्रपती रोखू शकतात - कलम 111

* राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांपैकी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याशी संबंधित तत्त्व - कलम 51

* भारतात मुद्रण स्वातंत्र्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांतर्गत अध्याहृत आहे - कलम 19 (1) (अ)















 






No comments:

Post a Comment